‘रेमंड’च्या मानद अध्यक्षपदावरुन विजयपथ सिंघानियांना हटवलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – ‘रेमंड’कंपनीचे माजी अध्यक्ष विजयपथ सिंघानिया यांना मानद अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेतल्यानंतर सिंघानिया यांना मानद अध्यक्षपद देण्यात आलं होतं. मुलगा गौतम सिंघानियासोबत  वाद झाल्यामुळे आपलं पद काढून घेतल्याचा आरोप विजयपथ सिंघानियांनी केला आहे.
रेमंड कंपनीचे अध्यक्षपद दोन दशकं विजयपथ सिंघानिया यांनी भूषवलं आहे. त्यांनी कंपनीला दिलेल्या योगदानासाठी त्यांना निवृत्तीनंतर चेअरमन एमिरेटस हे मानद अध्यक्षपद देण्यात आलं होतं. पण काही दिवसांपासून सिंघानिया यांचे त्यांच्या मुलाशी प्रचंड वाद होत आहे. ‘ गौतमने माझे पेंटिग्स आणि पद्मभूषण पुरस्काराचं पदक मला आणून द्यावं’ अशी मागणी करणारं पत्र त्यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीला लिहिलं होतं. त्यानंतर त्यांचं मानद अध्यक्षपद काढून घेण्यात आल्यांच पत्र एका पदाधिकाऱ्याने त्यांना लिहिलं.
मात्र रेमंड कंपनीचं संचालक मंडळ जोपर्यंत मला याविषयी माहिती देत नाही, तोपर्यंत मी हे मान्य करणार नाही, असा पवित्रा विजयपथ यांनी घेतला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a228128e-d203-11e8-93db-75d771b4c96a’]
कंपनीला लिहिलेल्या पत्रात विजयपथ सिंघानियांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप रेमंड कंपनीच्या संचालक मंडळाने केला आहे. विजयपथ हे कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना गेल्या काही दिवसांपासून तुच्छ वागणूक देत असल्याचंही बोर्डाचं म्हणणं आहे. यामुळेच त्यांच्याकडून हे पद काढून घेतलं असल्याचा खुलासा रेमंडच्या वतीने करण्यात आला आहे.
माझ्यावरचे आरोप खोटे –  गौतम सिंघानिया
आम्हा दोघांमध्ये भांडण असलं तरी याचा पद काढून घेण्याच्या प्रकरणाशी काही संबंध नाही. त्यांचं पद काढून घेण्याचा निर्णय सर्वस्वी रेमंडच्या बोर्डचा होता आणि त्या निर्णयाशी माझा काही संबंध नाही. बोर्डाच्या निर्णयांमध्ये मी ढवळाढवळ करत नाही’ असं स्पष्टीकरण गौतम सिंघानिया यांनी दिलं आहे. तसंच विजयपथ सिंघानिया त्यांचे पदक आणि पेंटिग्स कुठेतरी ठेवून विसरले असतील असंही त्यांनी सांगितलं.
[amazon_link asins=’B073YDY5PR,B07B6L7CTB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cd6e698f-d203-11e8-8129-b348e582fdc2′]