भोसरीत तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – लांडेवाडी भोसरी येथे भांडणाच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना रविवारी (दि. 12) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

अशोक रामभाऊ गव्हाणे (३०, रा. विठ्ठलनगर लांडेवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने फिर्याद दिली आहे. महादेव बाजीराव खाडे (३०, रा. लांडेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेपाचच्या सुमारास अशोक आणि महादेव यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणानंतर अशोक लांडेवाडी येथे भोसरी-पिंपरी रस्त्यावरून पायी चालत जात होता. त्यावेळी महादेव याने मागून येऊन अशोकवर लोखंडी कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये अशोकला डोक्यावर आणि हातावर गंभीर इजा झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भोसरी पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like