सांगली जिल्हयातील पलूस तालुक्यात बोट उलटली, ९ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

सांगली : पोलीसमाना ऑनलाइन – पलूस तालुक्यातील ब्रम्ह्नाळ येथे बचाव कार्यासाठी गेलेली खासगी बोट पाण्याच्या प्रवाहामुळे उलटली असून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. बोटमध्ये एकूण २५ ते ३० जण होते अशी माहिती मिळाली आहे.

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेली बोट उलटली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, एनडीआरएफच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले आहे. वाहून गेलेल्यांपैकी १० ते १२ जण काठावर पोहचले आहेत. चौघांचा शोध चालु आहे. बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. बोट उलटून ९ जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासकीय अधिकाèयांनी सांगितले आहे.

वाहून गेलेल्या चौघांचा शोध घेण्याचे काम चालु आहे. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानीचे राजु शेट्टी आणि इतरांनी प्रतिक्रिया दिली असून अलमट्टी धरणातून यापुर्वीच पाणी सोडण्यात यायला हवे होते असे त्यांचे म्हणणे आहे. तसे झाले असते तर सांगली शहरात पाणी शिरले नसते. बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त