सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग संगम खाडीपात्रात नौकाविहार करणाऱ्या पर्यटकांची नौका उलटली. या दुर्घटनेत एका वृद्ध महिला पर्यटकाचा मृत्यू झाला असून आठ जणांना वाचवण्यात यश आले आहे. माया मोरे (वय-60) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या वृद्ध महिला पर्यटकाचे नाव असून त्या कल्याणमधील आंबिवली येथील रहिवासी होत्या. ही घटना आज (गुरुवार) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
देवबाग संगम खाडीमध्ये कल्याण व ठाणे येथील काही पर्यटक नौकाविहार करण्यासाठी आले होते. हे पर्यटक नौकाविहार करत असताना अचानक सोसायट्याचा वारा आल्याने नौका कलंडली, असल्याचे सांगण्यात येत आहे. नौका उलटल्याचे लक्षात येताच स्थानिक मच्छिमारांनी तातडीने धाव घेत सर्व पर्यटकांना बाहेर काढले. सर्व पर्यटकांना मालवण येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच माया मोरे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
कालच हवामान खात्याने मुंबईसह कोकण किनारपट्टी व उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला होता. अरबी समुद्रामध्ये आगामी 24 तासात पवन आणि अम्फन ही दोन चक्रीवादळं निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यातल आली होती. तसेच चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. या वाऱ्याचा वेग प्रतितास 40 ते 50 किलोमीटर राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.
- नियमित खजूर खाल्ल्याने होतात ‘हे’ ११ आरोग्य फायदे, जाणून घ्या
- तुळस औषधी असली तरी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा होतील ‘हे’ ५ साईड इफेक्ट
- नियमित खा शेंगदाणे, होतील ‘हे’ आरोग्यदायी १० फायदे, जाणून घ्या
- तुम्ही दिवसभर एसीमध्ये बसता का ? काळजी घ्या, होऊ शकतात ‘या’ ८ समस्या
- सतत बसून राहण्याचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी करा ‘हे’ ११ उपाय
- ‘थायरॉइड’ आजारातील ‘हे’ २ भेद लक्षात घ्या, जाणून घ्या ६ लक्षणे
- संत्र्यापेक्षा सरस आहे शिमला मिरची ! ‘हे’ आहेत ७ आश्यर्चकारक फायदे