नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यातच अनेक बँकांमध्ये आवश्यक कामांशिवाय कोणाला प्रवेश दिला जात नाही. त्यावर बंधने घालण्यात आली आहेत. कोरोना काळात डिजिटल व्यवहारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या सर्व परिस्थितीनंतर आता ‘बँक ऑफ बडोदा’ने खातेदारांच्या सोयीसाठी WhatsApp वर अनेक सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
To maintain social distancing, you can continue your banking services from your home. #BankofBaroda is here by your side 24×7, with these simple and easy ways. #BankfFromHome #BreakTheChain #StaySafeBankSafe pic.twitter.com/MiXNKaCSc8
— Bank of Baroda (@bankofbaroda) May 10, 2021
आता बँक ऑफ बडोदाच्या खातेदारांना यापुढे बॅलन्स चेक करण्यासाठी किंवा चेकबुक इत्यादीसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. बँकेने खातेदारांच्या सोयीसाठी काही विशेष नंबर जारी केले आहेत. त्यामाध्यमातून व्यवहारांचा तपशीलासह फक्त WhatsApp चा उपयोग करून खात्यातील शिल्लक रक्कमची माहिती घेऊ शकता. टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही इतर सुविधांचा लाभ घेऊ शकता. त्याबाबतची माहिती बँकेने ट्विट करून दिली आहे. बँकेने खातेदारांसाठी आवश्यक असणाऱ्या क्रमांकांची माहिती मिळणार आहे. बँक खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी 8468001111 वर संपर्क करा. खात्यातील शेवटचे 5 व्यवहार जाणून घेण्यासाठी 8468001122 वर कॉल करा.
तसेच बँकेच्या WhatsApp सेवांसाठी 8433888777 या क्रमांकावर टोल फ्री नंबर 18002584455/18001024455 या क्रमांकावर माहिती घेऊ शकता. तुम्हाला मोबाईलच्या काँटॅक्ट लिस्टमध्ये बँकेचा व्हॉट्सअॅप बिझनेस अकाऊंट नंबर 8433888777 सेव्ह करावा लागेल. या क्रमांकाद्वारे आपण शिल्लक तपासण्यासह शेवटच्या पाच व्यवहारांची माहिती आणि चेकबुकसाठी अर्ज करू शकता.