Video : बॉबी देओलची वेब सीरीज ‘आश्रम’चा ट्रेलर रिलीज, भक्तीच्या मोहात दिसेल ‘दुष्कर्म’

नवी दिल्ली : एम एक्स प्लेयर प्लॅटफॉर्मने भारतीय दर्शकांसाठी प्रमुख विषय लक्षात घेता क्वीन आणि टाइम्स ऑफ म्यूजिकसोबत हात मिळवणी केली आहे. जेणेकरून प्रेक्षकांपर्यंत चांगला कंटेट पोहचवता येईल. प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक प्रकाश झा घेऊन येत आहेत एम एक्स ओरिजनल सीरीज ‘आश्रम‘. जी 28 ऑगस्ट 2020 ला रिलीज केली जात आहे. वेब सीरीजमध्ये बॉबी देओल लीड रोलमध्ये दिसणार आहे. मोठ्या कालावधीनंतर बॉबी देओलच्या हाती एक मोठा प्रोजेक्ट आला आहे आणि दर्शकसुद्धा याबाबत उत्साहित दिसत आहेत.

टीजर आणि पोस्टरमुळे या शोने मोठ्या कालावधीपासून प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या वेब सीरीजसह राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक प्रकाश झा ओटीटी प्लेटफॉर्मवर डेब्यू करत आहेत. या वेब सीरीजमध्ये बॉबी देओल काशीपुरवाले बाबा निरालाच्या भूमिकेत दिसणार आहे. वेब सीरीजबाबत अगोदरपासून खूप चर्चा होत आहे. सीरीजचा ट्रेलर सुद्धा रिलिज केला आहे.

सोमवारी हा ट्रेलर रिलीज करण्यात आला, जो हा प्रश्न उपस्थित करतो की, कशाप्रकारे काही स्वयंघोषीत नेते सरळ आणि निष्पाप विश्वासू लोकांचे शोषण करण्यासाठी सत्य लपवतात आणि चालबाजांना आश्रय देतात. काशीपुरवाले बाबा निराला आणि त्याच्या आश्रमावरील अतूट निष्ठेवर, ही काल्पनिक कथा तयार करण्यात आली आहे. वास्तवात विश्वास आणि श्रद्धेचे स्थान बुवाबाबांच्या सान्निध्यात उरले आहे का, किंवा प्रत्येक बाबा आणि साधूकडे शंकेच्या नजरेने पाहावे का, याकडे ही वेब सिरिज संकेत करते. सत्य कुणापासून लपलेले नाही.

बॉबी देओलसह या कलाकारांचा सहभाग
मागील काही कालावधीपासून ज्याप्रकारे आसाराम आणि गुरमीत राम रहीम सारख्या बाबांचा पर्दाफाश झाला आहे, तो पाहता ही वेब सीरिज लोकांचे डोळे उघडण्यासाठी योग्य पाऊल दिसत आहे. प्रकाश झा निर्मित आणि दिग्दर्शित या वेब सीरीजमध्ये बॉबी देओलसह अदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्यन सुमन, त्रिधा चौधरी, विक्रम कोचर, तुषार पांडे, सचिन श्रॉफ, अनुरीत कुशवाहा, राजेश शर्मा सुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.