‘भारत’ या चित्रपटामधून बॉबी देओल झळकणार 

मुंबई : पोलीसनामा  ऑनलाईन 
चित्रपट सृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल काही दिवस चित्रपटसृष्टीपासून दूर गेलेला अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा चित्रपट सृष्टीकडे वळला आहे. सध्या तो ‘हाऊसफुल ४’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.  बॉबीने सलमान खानच्या ‘रेस ३’ या चित्रपटातून दमदार पदार्पण केलं मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. त्यामुळे बॉबीचा हा चित्रपटही फ्लॉप ठरला आहे. त्या चित्रपटामुळे तो यशस्वी झाला नाही. बॉबी देओलने त्याच्या  २३ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बॉबीने केवळ तीनच सुपरहिट चित्रपट दिल्याच समोर आलं आहे.
सध्या बॉबी देओल  हा सध्या  ‘हाऊसफुल ४’  चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. या व्यतिरिक्त तो ‘यमला पगला दिवाना’ आणि ‘भारत’ हे दोन  चित्रपटात काम करत असून ‘भारत’ या चित्रपटामध्ये  तो प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. भारत या चित्रपटासाठी बॉबीने चांगलीच कंबर कसली आहे. सध्या तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. बॉबीने त्याची अभिनयाची  कारकीर्दीची  ‘बरसात’ या चित्रपटापासून सुरुवात झाली. या चित्रपटामध्ये बॉबीने अभिनेत्री ट्विंकल खन्नाबरोबर स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर चित्रपटसृष्टीत सक्रिय झालेल्या बॉबीचे केवळ तीनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकले.
[amazon_link asins=’B07FLYLF4G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a512d57c-8ffe-11e8-81ab-59e78cde22eb’]
बॉबी देओलचा  ‘गुप्त’ हा चित्रपट  विशेष चर्चेत आला होता. या चित्रपटामध्ये बॉबीबरोबर काजोल आणि मनीषा कोईरालाने स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर   ‘सोल्जर’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटामध्ये प्रिती झिंटाही झळकली होती. ‘गुप्त’ आणि ‘सोल्जर’ या चित्रपटांच्या यशानंतर बॉबीने ५ वर्षामध्ये जवळपास ७ चित्रपटांमध्ये काम केलं मात्र हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर जादू चालवू शकले नाही.  मात्र हा काळ गेल्यानंतर २००२ सालामध्ये त्याने केलेल्या’ हमराज’ या चित्रपटाने चांगली कमाई केली.अनेक यशस्वी चित्रपटानंतर बॉबी देओल आता भारत  मध्ये दिसणार आहे.