बॉबी देओलची सीरिज Aashram Chapter 2 एम एक्स प्लेअरवर Live !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार बॉबी देओल (Bobby Deol) स्टारर आश्रम (Aashram) या वेब सीरिजचा पहिला सीजन प्रचंड गाजला. यानंतर आता लवकरच याचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. आश्रम चॅप्टर 2 – द डार्क साईड (Aashram Chapter 2 – The Dark Side) चा ट्रेलरही नुकताच रिलीज करण्यात आला आहे. पहिल्या सीनजमध्ये यातील काही पात्रांनी खूप लक्ष वेधलं होतं. डायरेक्टर प्रकाश झा (Prakash Jha) यांनी डायरेक्ट केलेली ही सीरिज एम एक्स प्लेअरवर (MX Player) रिलीज झाली होती. आता याचा दुसरा सीजनही म्हणजेच आश्रम चॅप्टर 2 – द डार्क साईड एम एक्सवर लाईव्ह झाला आहे.

आश्रमच्या सीरिजच्या पहिल्या सीझनला 400 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. खुद्द प्रकाश झा यांनीची याबाबत माहिती दिली होती. पहिला सीजन हा 28 ऑगस्ट रोजी एम एक्स प्लेअरवर रिलीज झाला होता. आज (बुधवार दि 11 नोव्हेंबर) याचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आश्रम चॅप्टर 2 – द डार्क साईडचा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला होता तेव्हाच त्याला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता. बाबा निरालाचा पर्दाफाश होणार का आणि झाला तर कसा होणार अशी उत्सुकता साऱ्यांनाच लागली होती. याचा खुलासा आता सीजन 2 मध्ये होणार आहे असं ट्रेलरवरून दिसत होतं.