अभिनेता बॉबी देओलची पत्नी तान्या ‘कमाई’च्या बाबतीत त्याच्यापेक्षाही एक पाऊल पुढं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – धरम पुत्र म्हणून ओळख असलेले बॉबी देओल यांना सर्व जण ओळखतात. बॉबीच्या करिअरची सुरुवात चांगली झाली होती मात्र त्यानंतर बॉबीला तितकेसे यश मिळवता आले नाही. मात्र बॉबीच्या यश अपयशामध्ये त्याच्या पत्नीने चांगली साथ दिली. विशेष म्हणजे कमाई बाबत बोलायचे झाले तर तान्या बॉबी पेक्षा एक पाऊल पुढे आहे.

भलेही तान्या फिल्मी दुनियेपासून दूर राहत असेल परंतु ती एक यशस्वी बिझनेस करणारी महिला आहे. तान्या फर्निचर आणि होम डेकोरचा व्यवसाय करते. त्यांच्या शोरूमचे नाव ‘द गुड अर्थ’ आहे. फिल्मी दुनियेतील अनेक नामी हस्थी ताण्याचे ग्राहक आहेत. ट्वीकल खन्नाच्या शोरूममध्ये देखील ताण्याच्या डिझाईनची लाईन लागलेली आहे. तान्या एका मोठ्या उद्योगपतींची मुलगी आहे.

बॉबी-तान्याचे 1996 मध्ये लग्न झाले आणि आता त्यांना आर्यमन आणि धर्म अशी दोन मुले आहेत. दोघांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे. बॉबी त्याच्या काही मित्रांसोबत चहा पिण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तान्याही त्याच रेस्टॉरंटमध्ये आली. बॉबी तिला पाहून प्रेमात पडला. मग बॉबी तान्याबद्दलची सर्व माहिती काढली आणि तिला फोन केला. दोघांची भेट झाली. बॉबी तान्याला डेटसाठी त्याच रेस्टोरंट मध्ये घेऊन गेला ज्या ठिकाणी त्याने पहिल्यांदा तिला पाहिले होते. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांची भेट झाली. धर्मेंद्र यांना देखील बॉबीची निवड आवडली मग लगेचच त्यांचा विवाह पार पडला.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like