कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी तालुक्यातील वरखडे शिवारातील एका शेतामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. शंकर जयवंत फासाटे (वय ६८, डोंगरगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वरखडे शिवारातील बळीराम देवीदास तोंडे यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यानंतर पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे, एएसआय पवार, पोलीस नाईक माने, यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी गावातील लोकांना बोलावण्यात आले. मयत व्यक्तीचे नाव शंकर जयवंत फासाटे असून ते डोंगरगावचे असल्याचे समजले. त्यानंतर फासाटे यांच्या कुटूंबीयांना कळवण्यात आले. कुटूंबीयांना मृतदेहाची ओळख पटली. मृतदेहावर घटनास्थळीच शवविच्छेदन करुन मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

फासाटे यांची मानसिक स्थिति बरी नव्हती. ते ३० एप्रिलपासून घरातुन निघून गेले होते. जवळपासच्या सर्व पाहूणे व इतर ठिकाणी शोध घेतला परंतु ते कुठेही आढळून आले नाही. असे मयत शंकर फासाटे यांच्या कुटूंबीयांनी सांगितले. पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत.

Loading...
You might also like