प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाईन- नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील गौऱ्या या गावात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवक आणि युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना आज (गुरुवार) उघडकीस आली. मृत तरुण-तरुणी हे प्रेमीयुगुल असल्याची शक्यात वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृत युवकाचे नाव दिनेश गोट्या पावरा (वय २५) आणि मयत युवतीचे नाव कवित्री झिंग्या पावरा (वय २१) असे आहे. या दोघांनी एका टेकडीवर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

हे प्रेमीयुगुल असावे असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या यावरही उलट- सुलट चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांनी जळगाव पोलिस ठाण्यात अकस्‍मित मृत्यूची नोंद करून दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.

पत्नी घर सोडून गेल्याच्या रागातून जन्मदात्या आईचा केला खून