कांदिवली : एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह, 2 मुलींची हत्या करून बापाने आत्महत्या केल्याचा संशय

कांदिवली : पोलीसनामा ऑनलाइन – एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरातील खान गल्लीत गुरुवारी (दि. 3) सायंकाळी सहा वाजण्याच्या ही धक्कादायक घटना घडली आहे. 45 वर्षीय अजगर अली जब्बार अली नावाच्या वडिलांनी दोन मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद केली आहे.

कैनन (वय 12) आणि सुजैन (वय 9) असे हत्या झालेल्या दोन मुलींची नावे आहेत, तर अजगरअली जब्बार हा लोहार काम करत असत. सायंकाळी घरी आल्यानंतर त्याने मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांना एकूण 4 मुली आहेत. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तेव्हा अजगरअली हा दोरीच्या साह्याने लोखंडी अँगलला गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच एक मुलगी जमिनीवर तर दुसरी मुलगी ही खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. घटनास्थळी कांदिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी धाव घेत तपास सुरू केला आहे.

You might also like