Body Builder Manoj Patil | मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलचा सुसाईडचा प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  Body Builder Manoj Patil | मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटीलने (Body Builder Manoj Patil) बुधवारी रात्री गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. मनोज पाटीलवर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान मनोज पाटीलने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये त्याने अभिनेता साहिल खानचा उल्लेख केला आहे.

मिस्टर ऑलिम्पियासाठी मिस्टर इंडिया राहिलेला मनोज पाटील प्रयत्न करत होता. साहिल खानलाही या स्पर्धेत उतरायचं होतं. मात्र, साहिल आपण या स्पर्धेत उतरू नये यासाठी प्रयत्न करत होता असा आरोप मनोज पाटीलने केला आहे. व्यावसायिक तसेच इतर वादही दोघांमध्ये होते. याशिवाय साहिल खान सोशल मीडियावर आपली बदनामी करत होता यामुळे या सर्व गोष्टींमुळे मनोजने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, साहिलकडून होणाऱ्या त्रासाबद्दल मनोजने व्हीडिओ शेअर केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं मनोज पाटीलने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात मनोज पाटीलच्या कुटुंबाकडून तक्रार दाखल करण्यात आली असून पाटील कुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेऊन मदतीची मागणी करणार असल्याचे समजते.

 

Web Title :  mr india body builder manoj patil tried to commit suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anil Parab | राजकीय संघर्षासाठी न्यायालयाचा वापर नको; उच्च न्यायालय अनिल परब यांचे म्हणणे ऐकणार

Nanded Crime | नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थीनीचे रॅगिंग, वसतिगृह अधीक्षकांसह 3 विद्यार्थिनींविरुद्ध गुन्हा

Raj Kundra Case | राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात पत्नी शिल्पा शेट्टी बनली साक्षीदार

Ola Scooter खरेदी करू शकता रात्री 12 वाजेपर्यंतच, पहिल्या दिवशीच प्रत्येक सेकंदाला विकल्या गेल्या 4 स्कूटर !