ऑफिस किंवा घरी सतत बसून काम करत असाल तर वाढू शकते शरीरातील चरबी ! ‘या’ 7 टीप्स वापरून रहा ‘फिट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ऑफिसमध्ये सतत बसून काम केल्यानं आणि शरीराची जास्त हालचाल न झाल्यानं अनेकांचं वजन वाढतं. याचवेळी चहा आणि कॉफीचं जास्त सेवन केलं जातं आणि यामुळं फॅट्स वाढतात. तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये सतत बसून काम करत असाल तरीही स्वत:ला मेंटेन ठेवू शकता. यासाठी आपण काही टीप्स जाणून घेणार आहोत.

1) जास्त चाला – ऑफिसमध्ये काम करत असताना मध्ये मध्ये उठून चक्कर मारा. घरी आल्यानंतर थोड चालणं होईल याकडेही लक्ष द्या. नेहमी लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा.

2) शरीराची किंवा बसण्याची स्थिती नीट ठेवायला हवी – वजन करण्यासाठी बसण्याची स्थितीही महत्त्वाची असते. बसताना कायम सरळ बसा. यामुळं मान, पाठ किंवा कंबरदुखीही होत नाही. जर खुर्ची जास्त आरामदायक नसेल तर त्यावर कुशन ठेवून बसा. यानेही आराम मिळतो.

3) शरीर हायड्रेट करत रहा – काम करत असताना भरपूर पाणी प्या. यामुळं आरोग्य आणि त्वचा दोन्ही चांगलं राहिल. याशिवाय जास्त पाणी पिल्यानं लघवीला जास्त येईल. यानिमित्तानं तुम्ही जागेवरून उठाल आणि तुमचं थोडं फार चांलणं होईल.

4) चेअर एक्सरसाईज करा – तुम्ही बसल्याजागी काही एक्सरसाईज करूनही शरीर लवचिक ठेवू शकता. स्ट्रेचिंग, नेक रोटेशन, सीटेड टोरसो ट्विस्ट, क्रॉस्ड लेग, शोल्डर रोटेशन असे काही व्यायाम करता येतील.

5) स्नॅक्सची सवय बदला, जंक फूड टाळा – जर मध्ये मध्ये भूक लागत असेल तर जंक फूड ऐवजी ड्राय फ्रूट्स किंवा बजेट नसल्यास तुम्ही स्प्राऊट्स खाऊ शकतात. यामुळं वजन आणि चरबी वाढणार नाही आणि तुम्ही हेल्दी राहाल.

6) ब्रेकफास्ट – ब्रेकफास्ट हेवी आणि पोटभर करा. यातही हेल्दी फूड ठेवा. केळी, सफरचंद, डाळिंब असे फ्रुट्स किंवा ज्यूसही तुम्ही घेऊ शकता. जेवढा जास्त आणि हेल्दी ब्रेकफास्ट असेल तेवढंच जास्त तुम्ही एनर्जेटीक रहाल आणि काम कराल. यामुळं वजनही जास्त वाढणार नाही.

7) साखरेचं सेवन कमी करा – जर तुम्हाला अंस वाटत असेल की, तुमचं शरीर जास्त आणि सतत अॅक्टीव रहावं तर साखरेचं सेवन कमी करायला हवं. नाही तर किती डाएट केला तर फायदा होणार नाही. कारण साखरेमुळं खूप जास्त आणि लवकर फॅट्सचं प्रमाण वाढतं. चहा आणि कॉफीतून शरीरात खूप जास्त प्रमाणात साखर जाते. त्यामुळं चहा आणि कॉफी पिणं बंद किंवा कमी करा. तुम्ही ग्रीन टी, लेमन टी किंवा ब्लॅक घेऊ शकता.