गळफास घेऊन महिला पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या !

पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशातील मोहनलालगंज कोतवालीच्या पीआरव्ही (पोलिस रिपोर्टिंग व्हेइकल) मध्ये तैनात असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने (female police officer) गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. उर्मिला वर्मा (वय 24) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीसाचे (female police officer)  नाव आहे. ती शहरातील मऊ भागात वसतिगृहात राहत होती. वसतिगृहातील खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला आहे.

मोहनलालगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला मूळची अयोध्या जिल्ह्यातील आहे. रविरारी रात्री 10 वाजेपासून ती ड्युटीवर होती. मात्र ती ड्युटीवर पोहचली नव्हती. इतक्यात तिच्या वसतिगृहातील एक ओळखीचा माणूस आला आणि खोलीचा दरवाजा बराच वेळ ठोठावत राहिला. जेव्हा दार उघडले गेले नाही. तेंव्हा त्याने बाजूच्या एका महिला नर्सला सांगितले. महिला पोलीस अधिकाऱ्याने खोलीच्या दुसऱ्या दारातून आतील बाजूस पाहिले तेव्हा उर्मिलाचा मृतदेह ओढणीने पंखावर लटकलेला अवस्थेत दिसून आले.

त्यांनी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. यानंतर एसीपी प्रवीण मलिक, डीसीपी दक्षिण रवि कुमार घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खाली उतरवण्यात आला. उर्मिलाच्या घरातील सदस्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. तिचा मोबाइलही सापडला नाही. मोबाइलचा तपास केला जात आहे. याशिवाय इतरही अनेक मुद्द्यांचा शोध घेतला जात आहे.