काँग्रेस नेता म्हणतोय, ‘कोरोना लशीत गाय आणि डुकराची चरबी; आमचा धर्म भ्रष्ट होईल, आम्हाला नको ती लस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचा Corona vaccine संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्यातच आता कोरोनावरील लसीकरण Corona vaccine सुरू आहे. त्यावरून एका काँग्रेस नेत्याने अजब दावा केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले, की माझा धर्म हिंदू आहे. आमच्या धर्मात या गोष्टींचे सेवन करणे पाप मानले जाते. याचा निषेध केला जातो. कोरोना लशीत गाय, डुकराची चरबी आमचा धर्म भ्रष्ट होईल.

छत्तीसगडच्या कवर्धा येथील बोडला नगरपंचायतीच्या अन्न व नागरी पुरवठा आणि आरोग्य वैद्यकीय विभागाचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते ओमप्रकाश शर्मा यांनी कोरोनावरील लसीबाबत अजब दावा केला आहे. त्यांनी या लशीचा संबंध थेट धर्माशी जोडला आहे. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिऱ्यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की कोरोना लसीमध्ये गाय, डुक्कर आणि गर्भपात केलेल्या बाळाच्या मांसाचा समावेश आहे. त्यामुळे धर्माचा आधार देत मला ही लस घेण्यापासून सूट द्यावी, अशी मागणी केली आहे.

तसेच ते म्हणाले, माझा धर्म हिंदू आहे. आमच्या धर्मात या गोष्टींचे सेवन पाप मानले जाते. आम्ही याचा निषेध करतो. याच कारणामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला लस घेण्यापासून सूट मिळावी. या लसीमुळे आमचा धर्म भ्रष्ट होईल.

उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेकांनी घेतली लस

कोरोनावरील लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली आहे. त्यानुसार, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी कोरोनावरील लस Corona vaccine घेतली.

यूजर्सना होणार फायदा ! BSNL चा नवा Data Add-ons प्लान जाहीर, जाणून घ्या

NET-SET धारकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी; म्हणाले – ‘वर्षा बंगल्यावर धुणी-भांडी करण्याचं काम द्या’

खळबळजनक ! मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने भाजप नेत्याचा जावयावर खुनी हल्ला, 9 जणांवर FIR दाखल

अर्थसंकल्प 2021-22 : सरकारची मोठी घोषणा ! 3 लाखांपर्यंतचे कृषी कर्ज बिनव्याजी

‘…म्हणून राज ठाकरे मास्क वापरत नसतील’ – रामदास आठवले