‘या’ मंदिरात अर्पण केलं जातं ‘लिंग’, जगभरातील ‘या’ 5 विचित्र मंदिरांबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – काही मंदिरं अशी आहेत जेथे खूपच विचित्र प्रथा आणि परंपरा आहेत. या रहस्यमय मंदिरांमधील चमत्कार ऐकून सर्वच अवाक् होतात. अशाच काही वेगळ्या मंदिरांबद्दल आणि प्रथांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) मंदिरात अर्पण केलं जातं लिंग –
चाओ माई तुप्तिमचं मंदिर थायलंडमध्ये स्यान नदीच्या किनारी बँकॉकमध्ये बनवलं आहे. या मंदिराची खास बात अशी आहे की, या मंदिरात येणारे भक्त देवीला धातु, लाकडी किंवा रबरापासून बनवलेलं लिंग अर्पण करतात. असं मानलं जातं की यामुळे मूल होतं. बुद्ध काळात चाओ माई तुप्तिमला प्रजननाची देवी मानलं जात.

2) कामाख्या देवीला येते मासिक पाळी –
आसामच्या गुवाहाटीमधील कामाख्या देवीचं मंदिर रहस्यमय आहे. असं मानलं जातं की, वर्षातून एकदा येणाऱ्या अम्बोवाची पर्वादरम्यान कामाख्या देवीला मासिक पाळी येते. मंदिराच्या नाल्यात पाण्याऐवजी रक्त वाहतं. यावेळी देवीच्या मासिक पाळीच्या वेळीचं कापड प्रसाद म्हणून दिलं जातं असंही सांगतात.

3) देवीच्या तोंडातून निघते आग –
51 शक्तीपीठांपैकी एक आहे ज्वाला देवीचं मंदिर. हे मंदिर फेमस आहे. जेव्हा भगवान शिव पार्वतीचं सतीत जळालेलं शव घेऊन आकाशमार्गानं जात होते तेव्हा या ठिकाणी तिची जीभ पडली होती. याच ठिकाणी ज्वाला देवीचं मंदिर तयार झालं. अनेक वर्षांपासून इथं देवीच्या जीभेतून आग न विझता सुरूच आहे.

4) मंदिरावर फेल झाले पाकिस्तानी बॉम्ब –
माता तनोट रायचं मंदिर जैसलमेरमध्ये आहे. भारत-पाक सीमेवर हे मंदिर आहे. 1965 आणि 1971 च्या युद्धादरम्यान पाकचे सैनिक भारतीय सीमेत आले होते. त्यांनी मंदिरावर हल्ला केला. परंतु एकही बॉम्ब फुटला नाही. उलट मतिभ्रम होऊन ते आपापसात लढले. त्यावेळी निष्क्रिय झालेले बॉम्ब आजही मंदिराच्या संग्रहालयात आहेत.

5) दरवाजे नसलेली घरं –
महाराष्ट्राच्या अमहदनगर जिल्ह्यात शनी शिंगणापूरचं प्रसिद्ध मंदिर आहे. असं म्हटलं जातं की या गावावर शनी देवाची कृपा आहे. लोकांच्या घराला दरवाजाच नाहीये. असं मानलं जातं की, गावात चोरी होत नाही आणि कोणी तसा प्रयत्न केला तर त्याचं नुकसान होतं. ही लोकं खुलेआम आपलं सामान सोडून जातात. असं सांगितलं जातं की, मामा भाच्याला स्वप्नात जाऊन शनी देवानं सांगितलं की, जवळच्या नदीत एक काळ्या रंगाचा पाषाण तरंगत आहे. तो स्थापित करून त्याची पूजा करा. पाषाणाच्या रुपात तो मीच आहे. तेव्हा त्यांनी लोकांच्या मदतीनं शनी देवाच्या रुपात मंदिराची स्थापना केली आहे.