‘महाराष्ट्र श्री’, ‘भारत श्री’ आणि ‘आशिया श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा यंदा प्रथमच ऑनलाइन, जाणून घ्या स्वरूप

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाच्या महासंकटानं सर्वच क्षेत्रात उलथापालथ घडवली आहे. याचा फटका क्रीडा क्षेत्रास देखील बसला आहे. मात्र, शरीरसौष्ठवपटूंची वर्षभराची मेहनत वाया जाऊ नये यासाठी ‘महाराष्ट्र्र श्री’, ‘भारत श्री’ आणि ‘आशिया श्री’ या शरीरसौष्ठव स्पर्धा यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचं सांगण्यात आलं. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डिंग ऍन्ड फिटनेस फेडरेशन तसेच, एशियन फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग ऍन्ड फिटनेस या संघटनांकडून जुलै महिन्यात या स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने भरविण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्रीडा संघटनांचे स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही संघटनांनी नियोजित स्पर्धा रद्द केल्या आहेत. तर काही क्रीडा संघटनांचा ऑनलाइन माध्यमातून स्पर्धा भरविण्याकडं कल दिसून येत आहे. महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, इंडियन बॉडी बिल्डिंग ऍन्ड फिटनेस फेडरेशन या दोन्ही संघटना त्याला अपवाद राहिलेल्या नाहीत. जिम बंद असल्याच्या कारणामुळे अनेक खेळाडू घरी राहूनच व्यायाम करत आहे. त्यांच नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय संघटनांनी घेतल्याच कळतं.

याबाबत ‘आयबीबीएफएफ’चे सरचिटणीस डॉ. संजय मोरे यांनी म्हटलं, ” कोरोना संसर्गामुळं शरीरसौष्ठवपटूंचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी आम्ही प्रथमच ‘महाराष्ट्र श्री’,’भारत श्री’ आणि ‘आशिया श्री’ या सारख्या महत्वाच्या स्पर्धांच डिजिटल स्वरूपात म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने आयोजन करणार आहोत. यावेळी साधारणतः ५ स्पर्धकांची कामगिरी पाहता येईल असे विशिष्ट सॉफ्टवेअर आम्ही डिझाईन करून घेतले आहे. त्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. तसेच याच थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्यानं ही स्पर्धा यु-ट्युब, फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहता येणार आहे. या स्पर्धाचे निकालही ऑनलाइन असतील. यशस्वी स्पर्धकांना त्यांच्या पारितोषिकांची रोख रक्कम खात्यात जमा केली जाणार आह. पदके, चषक कुरियरमार्फत पाठविले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like