महिलेशी सलगी करणे पडले महागात; दोघांच्या झटापटीत एकाचा खून

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – तालुक्यातील नरढाणा गावा जवळ सकाळी विश्रागृह जवळील परिसरात एका अज्ञात इसमाचा मृतदेह रस्त्यावर पडलेला आढळून आला. नागरीकांनी पोलीस स्टेशनला खबर दिली. पोलीसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली . प्रथमदर्शी झटापटीत त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. अंगावर मारहाण केल्याच्या जखमा दिसुन आल्या. यावेळी श्वान पथकाची मदत घेण्यात आली.  या खुनाची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. तिथे गर्दी झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी तपास चक्रे फिरवत एका व्यक्तीला संशयावरुन एकाला ताब्यात घेतले.

या बाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी कि, नरढाणा गावातील एका हॉटेल मधील कर्मचारी हा महिलेशी सलगी करण्याचा प्रयत्न करत होता. तो नेहमीच महिलेची छेड काढत असे. काल राञी महिला एका पुरषा सोबत त्याला दिसली. त्यावेळी त्या पुरषाला दम भरत महिले सोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याला महिलेच्या सोबत असलेल्या रखवालदारने विरोध केला. यावेळी दोघात झटापट झाली व त्यात महिले सोबत आलेल्या व्यक्ती तिचा बचाव करताना जमीनीवर पडला. हे पाहताच महिलेशी बळजबरी करणारा तो पळुन गेला. या मारहाणीत महिलेचा बचाव करणाऱ्या व्यक्तीचा (रखवालदाराचा) मृत्यु झाला. हि बाब सकाळी उघडकीस आली.

पोलीसांनी या प्रकरणी चौकशी करत खुनाचा तपास काही तासात लावला व एकाला ताब्यात घेतले आहे. महिला सोबत आलेल्या व्यक्तीचा (रखवलदाराचा ) मी खून केला आहे.  हॉटेल मध्ये काम करणाऱ्या त्या तरुणाने खून केल्याचा कबुली जबाब पोलीसांना दिला. पोलीसांनी सदर तरुणास ताब्यात घेत. पोलीस ठाण्यात आणुन गजाआड केले.