शत्रूला आकाशातच ‘खल्‍लास’ करतं ‘अपाचे हेलिकॉप्टर’, ‘या’ एअरबेसवर राहणार ‘तैनात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाईदल अधिक शक्तीशाली होत आहे. भारतीय हवाई दलातील हेलीकॉप्टरची संख्या वाढली आहे. ४ अपाचे हेलीकॉप्टरची पहिली खेप शनिवारी गाजियाबाद येथील हिंडन एअरफोर्स स्टेशनला पोहचली आहे. या हेलीकॉप्टर्सना पंजाबच्या पठानकोट एअरफोर्स स्टेशला तैनात केले जातील. तसंच अजून ४ हेलीकॉप्टर पुढील आठवड्यात येणार आहेत.

अपाचे हे अत्यंत आधुनिक एएच-६४ हेलीकॉप्टर असून ते अमेरिकेतील एका कंपनीने तयार केले आहे. ठरलेल्या वेळेपूर्वीच या कंपनीने या हेलिकॉप्टरची डिलिव्हरी केली आहे. भारतात आगमन झाल्या झाल्या हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाला सुपूर्त करण्यात येणार आहे.

आयएएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितल्या प्रमाणे हे हेलिकॉप्टर व्यवस्थीत चेक करून झाल्यानंतर ते भारतीय हवाई दलाच्या ताब्यात देतील. तसंच हवाई दलाला सप्टेंबरमध्ये औपचारिक पद्धतीने सर्व आठ हेलीकॉप्टर सोपवण्यात येणार आहेत. हे सर्व म्हणजे आठही हेलीकॉप्टर पंजाबच्या पठानकोट एअरफोर्स स्टेशनला तैनात करण्यात येणार आहेत.

अपाचे एएच-६४ हेलीकॉप्टर हे जगातील सर्वात आधुनिक मल्टीरोल लढावू हेलीकॉप्टर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुरक्षेसाठी या हेलीकॉप्टरचा वापर केला जोतो. हे हेलीकॉप्टर असणारा भारत १४ वा देश आहे.

दरम्यान, सुरक्षा मंत्रालयाने २२ ए एच-६४ अपाचे हेलीकॉप्टर उत्पादन, प्रशिक्षण आणि समर्थन करण्यासाठी २०१५ मध्ये खरेदी करण्याचे ठरवले होते. हा खरेदी कराराअंतर्गत २०२० पर्यंत २२ अपाचे हेलीकॉप्टर भारतीय हवाई दलाला सोपण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त