Coronavirus : महामारी ! ‘या’ मोठया विमान कंपनीनं 12000 कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याची केली घोषणा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : विमान उत्पादन करणारी जागतिक कंपनी बोइंग ने 12,000 हून अधिक लोकांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी निर्बंधामुळे विमान उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. कंपनी पुढे अजून काही लोकांना नोकरीवरून काढून टाकू शकते. दरम्यान अमेरिकेची सर्वात मोठी उत्पादन करणारी ही कंपनी आठवड्यात 6,770 अमेरिकन कर्मचार्‍यांना कामावरून कमी करणार आहे. या व्यतिरिक्त 5,520 कर्मचार्‍यांनी ऐच्छिक सेवानिवृत्तीचा पर्याय निवडला आहे. बोईंगने जाहीर केले होते की ते आपल्या कर्मचार्‍यांमध्ये 10 टक्क्यांनी कपात करतील. कंपनीची एकूण कामगार संख्या 1,60,000 च्या आसपास आहे.

कोरोना विषाणू साथीला रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यवसायांवर परिणाम झाला आहे, त्यामुळे कंपन्यांनी कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्याला सुरवात केली आहे. बेंगळुरूच्या स्टार्टअप लाइव्हस्पेस (Livespace) ने 15 टक्के कर्मचाऱ्यांना म्हणजेच 450 लोकांना कामावरून कमी केले आहे. गेल्या आठवड्यातच कंपनीने हा निर्णय घेतला. त्याचवेळी ऑटो पार्ट्स तयार करणार्‍या रिको ऑटो इंडस्ट्रीज (Rico Auto Industries) ने 22 मे रोजी हरियाणामधील धारूहेरा प्लांटच्या 119 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले.

रोल्स रॉयस (Rolls-Royce) ने कमी केले कर्मचारी

कोरोना विषाणूच्या साथीमुळे होणाऱ्या हवाई प्रवासात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे एरोस्पेस इंजिन उत्पादक रोल्स रॉयसने जगभरातील जवळपास 9,000 नोकऱ्या कमी केल्या आहेत. कंपनीत एकूण 52,000 कर्मचारी आहेत आणि ही कपात कुठे केली जाईल हे अद्याप समजू शकलेले नाही. कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह वॉरेन ईस्ट म्हणाले की, या अप्रत्याशित काळात कंपनीला सांभाळण्यासाठी असे कठीण निर्णय घ्यावे लागतील.

ओला (OLA) ने देखील कर्मचारी केले कमी

कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपनी ओला रायडर्स, आर्थिक सेवा आणि फूड व्यवसायातील 1,400 कर्मचारी कमी (Ola do Layoffs) करणार आहे. गेल्या दोन महिन्यांत कोरोना विषाणूच्या साथीमुळे कंपनीच्या महसुलात 95 टक्क्यांनी घट झाली आहे. याबाबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या साथीमुळे गेल्या दोन महिन्यांत राइड, वित्तीय सेवा व फूड व्यवसायातून मिळणारे उत्पन्न 95 टक्क्यांनी कमी झाले आहे आणि यामुळे ते 1,400 कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात येत आहे.