पुण्यात 12 वी नापास ‘मेहबूब’ कंपाऊंडर चालवत होता 2 वर्षांपासून तब्बल 22 बेडचं हॉस्पिटल; अशा प्रकारे झाला पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील एका हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने स्वतःचंच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार पुढं आला आहे. त्याचं मूळ नाव मेहबूब शेख आहे तर बनावट नाव डॉ. महेश पाटील असं आहे. तर त्याने तब्बल २२ बेडचे हे हॉस्पिटल गेल्या २ वर्षांपासून चालवत असल्याचं उघड झालं आहे.

मूळचा नांदेड येथील असणारा १२ वी नापास मेहबूब शेख या कपांऊडरने आपलं बोगस नाव डॉ. महेश पाटील असं ठेवलं होत. आणि बनावट वैद्यकीय पदवी तयार करून हे हॉस्पिटल चालू केलं होतं. कोविड रुग्णांसाठी त्याने स्वतंत्र वार्डही देखील उभा केला होता, तर हे हॉस्पिटल पुण्यातील शिरूर येथे सुरु केलं होत. याबाबत माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. या प्रकरणावरून पोलिसांनी आरोपी कपांऊडरला अटक केली आहे. तर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कपांऊडरचं बनावट पदवी आणि नाव बदलून रुग्णालय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. महेश पाटील नावाने आरोपी रुग्णालय चालवत असल्याचं समजलं. त्याच्याकडे MBBS पदवी असल्याचं समोर आले.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पीआय पद्माकर घनवट यांनी असते म्हटले कि, पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलं की, मेहबूब शेख हा कपांऊडर म्हणून काम करायचा. नांदेडमधील एका हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता. काम करत असताना त्याला असं वाटलं की, वैद्यकीय कौशल्य आपण शिकलो आहोत. त्यानंतर त्याने शिरूरमध्ये २ वर्षांपूर्वी मौर्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरु केलं. त्याने बनावट डिग्री आणि आधार कुठून मिळवलं याचा तपास आम्ही करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे काही काळ त्याने कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डही सुरु केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. असे त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी कपांऊडरवर पोलिसांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.