बोहरी समाजाच्या वतीने स्थलांतरितांना मदतीचा हात

पुणे :  प्रतिनिधी –   कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे मजूर वर्ग गावाकडे जाण्यासाठी धडपडत आहे. त्यांना सुरक्षित गावी पाठविण्याचे नियोजन केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे. त्यानुसार वानवडी पोलीस स्टेशनअंतर्गत ४०० श्रमिकांना रेल्वे बिहारला पाठविण्यात आले. यावेळी बोहरी समाजाच्या वतीने बिहारला जाणाऱ्या श्रमिकांना जेवणाचे पॅकेट व पाणी पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.

अलिअजगर राजकोटवाला, पीआरओ मुर्तुजा अलीहुसेन ढिल्ला, वानवडी पोलीस स्टेशनचे दत्तात्रय तेलंग, पोलीस मित्र सुरेश तेलंग, प्रणव शिवशरण, विजय गायकवाड, हिरिष गिनेल्लू अप्पा चेनिगुंड यांनी विशेष सहकार्य केले.

बिहार येथील ४०० श्रमिकांना वानवडी पोलीस ठाणे येथून रेल्वेने बिहारला जाणाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. यावेळी परप्रांतीयांना वानवडी येथील दाऊदी बोहरी समाज पुणे, फातिमी मोहल्ला यांच्या संयुक्त विद्यमाने फिजिकल डिस्टसिंग व कोरोना विषाणू संदर्भातील माहिती देत अन्न पॅकेट, पाणी बाटली कर्तव्य म्हणून देण्यात आली. धर्मगुरू सैय्यदना मुफ्ततल सैफुद्दीन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मागिल चाळीस दिवसापासून गरजूंना दररोज जेवन, पाण्याची बाटली, औषधें, धान्याचे कीट देण्यात येत आहे.