Boiled Eggs Side Effect | उकडलेली अंडी खाण्याचा सर्वात मोठा साईड इफेक्ट, ‘जिम’ला जाणार्‍यांनी व्हावे सावध; जाणून घ्या

नवी दिल्ली : Boiled Eggs Side Effect | आरोग्याचे अनेक फायदे देणारे बॉईल अंड्याचे काही साईड इफेक्ट सुद्धा असतात. Women’s Health ने काही दिवसांपूर्वीच उकडलेल्या अंड्याच्या डाएटवर एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, बॉइल एग लीन प्रोटीन (मासे आणि चिकन), विना स्टार्चच्या भाज्या (पालेभाज्या, ब्रोकली, सिमला मिरची, शतावरी आणि गाजर) काही निवडक फळे (बेरीज, लिंबू, टरबूज) कमी फॅटच्या वस्तूंचा यादीत (Boiled Eggs Side Effect) समावेश आहे.

डायटिशियन आणि न्यूट्रशनिस्ट एरिन पलिन्स्की वेड नुसार, ब्रेकफास्टमध्ये लोक नेहमी उकडलेल अंडी फळांसोबत खातात. तर लंच आणि डिनरमध्ये ती काही भाज्यांसोबत किंवा लीन प्रोटीनसोबत खातात.

उकडलेल्या अंड्याच्या आहारामुळे सर्वात मोठा त्रास हा आहे की, यावर अवलंबून राहिल्याने आपल्या शरीराला ती अनेक पोषकतत्व मिळत नाही ज्यांची गरज असते.

डायटीशियन आणि न्यूट्रिशनिस्ट केरी यांच्या अहवालात खाण्याच्या अशा अनेक वस्तू सांगितल्या आहेत ज्या उकडलेल्या अंड्यामुळे आपल्या डाएटमधून बाहेर होतात. उकडलेल्या अंड्याच्या डाएटमुळे प्रोसेस्ड फूड, बटाटा, मका, मटर आणि शेंगा आहारातून बाहेर पडतात.

उकडलेल्या अंड्याचा डाएट फॉलो करणार्‍यांना केळे, अननस, आंबा, ड्राय फ्रूट्स आणि गोड पेय पदार्थ
टाळण्यास सांगितले जाते. असे करणे आरोग्यासाठी का योग्य नाही? ते एका नवीन स्टडीत सांगितलेल्या
उदाहरणावरून समजून घेता येईल. यात म्हटले आहे की कार्डियोव्हस्क्यूलर हेल्थसाठी धान्य खाणे आवश्यक
आहे आणि ते वजन कमी करण्यात सुद्धा उपयोगी आहे.

दोन उकडलेल्या अंड्यांना एक चांगला नाश्ता मानले जाते, परंतु ती दिवसभर खाणे चांगले नाही. अंड्यात लाभदायक  पोषकतत्त्वासह कॉलेस्ट्रोल आणि सॅच्युरेटेड फॅटसुद्धा असते जे लिव्हर आणि हृदयासाठी घातक आहे. आठवड्यात दोन अंडी दोन ते तीनवेळा खात असाल तर चिंतेचे कारण नाही.

हे देखील वाचा

High Court | विवाहित असूनही इतर कुणासोबत सहमतीने संबंधात राहणे गुन्हा नाही – हाय कोर्ट

ट्रेनमध्ये प्रवास करताना काही त्रास झाला तर Rail Madad App द्वारे ताबडतोब करा तक्रार; जाणून घ्या

IRCTC नं गुंतवणुकदारांना 2 वर्षात केलं ‘मालामाल’, एक लाखाचे दिले 10 लाख रुपये; जाणून घ्या ‘कमाई’चा मार्ग

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : boiled eggs one side effect can increase your health concerns

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update