धुळे : शिरपूरजवळील केमिकल कंपनीत स्फोट, 12 मृत्युमुखी तर 58 गंभीर जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हयातील शिरपूर जवळ असलेल्या रूमित केमिकल्स कंपनीमध्ये आज (शनिवारी) सकाळी झालेल्या भीषण स्फोटामध्ये आत्‍तापर्यंत 12 जण मृत्युमुखी पडले आहेत तर 58 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना जवळील हॉस्पीटीलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मयतांमध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे.

dhule-blast

रूमित केमिकल्स कंपनीत नेमक्या कोणत्या कारणामुळं स्फोट झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्‍नीशमन दलाचे जवान, पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक नागरिक कंपनीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अग्‍नीशमन दलाचे बंब घटनास्थळी सकाळीच दाखल झाले आहेत. सुरवातीला स्फोटामध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते मात्र आता मयतांचा आकडा वाढला असून तो 12 वर जाऊन पोहचला आहे. मयतांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. शिरपूरजवळ वाघाडी ही केमिकलची फॅक्टरी आहे. सकाळच्या सुमारास कंपनीत स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आजुबाजुच्या परिसराला देखील त्याचा हादरा बसला.

सुमारे 12 किलोमीटरपर्यंत स्फोटाचा आवाज गेला. परिसरातील काही शेजमजूर देखील यामध्ये जखमी झाले आहेत. कंपनीत झालेल्या स्फोटामुळं आसपासच्या घरांना देखील तडे गेल्याचे सांगण्यात येत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहचलेले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –