धुळे : शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, 7 जण ठार तर 30 जखमी

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हयातील शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी मोठा स्फोट झाला. वाहाडी केमिकल फॅक्टरीत झालेल्या बॉयरलच्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटात 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

शनिवारी फॅक्टरीत झालेल्या भीषण स्फोटामुळं जवळपास 2 किलोमीटरपर्यंतची जमीन हादरली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह वैद्यकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. हा स्फोट कशामुळं झाला आणि नेमकं काय झालं याचा तपास केला जात आहे.

आगीचे लोळ,काळ्या धुराचे लोळ वीस फुट उंच असल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहे.जिल्हातील जवळपास असलेल्या भागातून आगीवर नियंञण मिळविण्यासाठी अग्निशामक बंबाना पाचरण करण्यात आले. 100 जण कामगार फँक्टरीत काम करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.जखमीना शिरपुर कुटीर रुग्णालयात व काही जखमींना धुळे जिल्हा रुग्णाल्यात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like