वेल्डिंग करताना बॉयलरचा स्फोट ; २ कामगारांचा मृत्यू

खामगाव : पोलीसनामा ऑनलाइन – वेल्डिंग करत असताना बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात दोन कामगाराचा मृत्यु झाला असून अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.
शेख इसारार ऊर्फ सलमान शेख अबरार (वय २८, रा. फाटकपूरा, खामगाव) आणि शेख मुशीर शेख हनिफ (वय ३०, रा़ शौकत कॉलनी, खामगाव)अशी मृत्यु पावलेल्या कामगारांची नावे आहेत.
ही घटना खामगाव येथील भैय्युजी महाराज ऋषी संकुल परिसरातील दुर्गाशक्ती फुड्स प्रा लि़ या कंपनीत मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील बॉयलरच्या टाकीवर चढून कामगार मंगळवारी सायंकाळी वेल्डिंगचे काम करीत होते. त्यावेळी ठिणगी पडून अचानक स्फोट होऊन बॉयलरचे झाकण उडाले. त्यामुळे तेथे काम करीत असलेले कामगार फेकले गेले. त्यात दोघांचा मृत्यु झाला. या घटनेत फाटकपुरातील फरदीन खान, शेख अमिर हे अन्य दोघे जखमी झाले. त्यांना येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी तसेच रुग्णालयात जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, पोलिस निरिक्षक संतोष ताले यांनी भेट दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!

पुण्यातील डॉक्टर झटतेय काश्मीरमधील नागरिकांच्या आरोग्यासाठी

ई-फार्मसीसाठी ई-प्रिस्क्रिप्शनची गरज

रूग्ण वेळेत पोहचण्यासाठी रुग्णवाहिकेला आता ‘यल्लो कॉरिडोर’