शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेला उधाण

पोलिसनामा ऑनलाईन – सोशल मीडियावर शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सध्या चर्चेत आहे. हातात कोणत्याही प्रकारचे काम नसतातना मीरा शाहिदपेक्षा अधिक चर्चेत असते.  शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतवर हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल सेल्फी सोशल मीडियावर शेअर करतेय. तिचा फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्सहि मिळतात. अशा काही बोल्ड फोटोंमुळे मीरा चर्चेत आलीय.

 

 

 

 

 

 

सोशल मीडियावर मीराचे एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंत पाहायला मिळतोय. मध्यंतरी मीरा आणि शाहिद कपूर ’नच बलिये’ शोला जज करणार आहेत, अशा बातम्या आल्या होत्या.

 

 

 

 

 

मात्र, काही कारणामुळे मीराचे ऑनस्क्रीन झळकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. तर, दुसरीकडे बॉलिवूडमध्ये आपणही नशीब आजमवावे, असे स्वप्न शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत पाहू लागलीय.

सोशल मीडियावर ती तिच्या अपडेट शेअर करत सार्‍यांचे लक्ष वेधून घेत असते. पहिल्यांदा मीरा राजपूतने तिचा बोल्ड फोटो शेअर केलाय. यामुळे सार्‍यांना आश्चर्यचकीत केलंय. कारण, या फोटोंमुळे मीरा हि बॉलिवूडमध्ये एंट्री करणार की काय?अशा चर्चा होत आहेत.

या चर्चांना तिचा हाच फोटो सध्या कारणीभूत ठरलाय. मध्यंतरी हि तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या केवळ चर्चाच ठरल्या. चांगली संधी मिळाली तर, मीरा राजपुतही रूपेरी पडद्यावर झळकणार आहे, असे तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.

तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे ही तिच्या फॉलोव्हर्सच्या संख्येत प्रचंड वाढ होतेय. वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करतेय. मागील काही महिन्यांपासून मीरा आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येतेय.