‘गर्ल्स’ सिनेमाचं ‘BOLD’ पोस्टर रिलीज !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काहीसे वेगळे आणि थोडे बोल्ड विषय असलेले सिनेमे बॉईज आणि बॉईज 2 बॉक्स ऑफिसवर खूप गाजले. या सिनेमाच्या यशानंतर आता विशाल सखाराम देवरुखकर मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची सफर घेऊन येत आहे. गर्ल्स असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. सध्या पोस्टर सोशलवर व्हायरल होत आहे. पोस्टर पाहिलं तर याचे कारणंही तुमच्या लक्षात येईल.

मुलींच्या मस्ती मजेवर आधारीत सिनेमा आतापर्यंत तरी पाहायला मिळाला नाही. म्हणून हीच मजा मस्ती आता गर्ल्स सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं पोस्टर खूपच बोल्ड आहे. त्यामुळे या पोस्टरची खूप चर्चा होताना दिसत आहे. याशिवाय तरुणांमध्ये या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेंमेंट आणि कायरा कुमार क्रिएशन्स प्रस्तुत हा सिनेमा आहे.

चौकटीबाहेर जाऊन आयुष्य जगणाऱ्या आजच्या काळातील मुलींचं जग या सिनेमात पाहायला मिळणार आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये 3 मुली दिसत आहेत ज्यांनी आपला टॉप उतरवला आहे.

Visit : Policenama.com

You might also like