‘टकाटक’मधील ‘या’ प्रचंड ‘बोल्ड’ गाण्यानं तोडलेत सारेच रेकॉर्ड ! ‘या’ दिवशी छोट्या पडद्यावर टेलीकास्ट होणार सिनेमा

टकाटक हा असा एक मराठी सिनेमा होता ज्याची खूप चर्चा झाली होती. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे धमाल कॉमेडी, बोल्ड सीन आणि डबल मिनिंग डायलॉग आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं आहे. या सिनेमातील एक गाणं असं होतं जे प्रचंड बोल्ड होतं आणि खूप चर्चेत राहिलं मराठीत सिनेमात इतके बोल्ड सीन असणारं हे पहिलंच गाणं असल्याचं म्हटलं गेलं होतं. यातील सीन पाहिल्यानंतर अनेकांनी अशीच प्रतिक्रिया दिली होती. मागील वर्षी हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती.

सिनेमाचा ट्रेलर जेव्हा आला होता तेव्हापासूनच या सिनेमानं खूप लक्ष वेधलं होतं. नंतर जेव्हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा याला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला होता. यात सेक्स कॉमेडी असल्यानं याची खूप चर्चा झाली. कारण मराठीत सहसा असे बोल्ड सीन्स खूप कमी पहायला मिळतात.

सिनेमात अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर शुट झालेलं एक गाणं होतं. ये चंद्राला असं या गाण्याचं नाव आहे. यात प्रणालीचे अनेक बोल्ड सीन्स होते. तिचा हॉट अवतार आणि मादक अदांनी साऱ्यांनाच घायाळ केलं होतं. श्रुती राणेनं गायलेल्या या गाण्याला 1 कोटीहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

आता 26 जुलै 2020 रोजी दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता हा सिनेमा झी टॉकीजवर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. जर तुम्हालाही आता तुमचा रविवार जर टकाटक बनवायचा असेल तर झी टॉकीजवर हा सिनेमा नक्की बघा.