भूमी पेडणेकरनं शेअर केला बाथटबमधील ‘तसला’ फोटो !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर गेल्या अनेक दिवसांपासून सोशलवर चर्चेत येताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे काही ग्लॅमरस फोटो समोर आले होते ज्यांची खूप चर्चा होताना दिसली होती. यानंतर पुन्हा एकदा तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या भूमीचा बाथटबमधील फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

अलीकडेच भूमीनं इंस्टावरून एक फोटो शेअरे केला आहे. या फोटोत ती बाथटबमध्ये दिसत आहे. खास बात अशी की, भूमी या फोटोत न्यूड दिसत आहे. सध्या भूमीच्या या फोटोची चर्चा सुरू आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये भूमी म्हणते, “July 2020 #dabbooratnanicalendar” कॅप्शनवरून लक्षात येत आहे की, भूमीनं बॉलिवूडचा प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी हे फोटोशुट केलं आहे. सध्या भूमीचा हा न्यूड फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B6xgtlWpaEV/?utm_source=ig_embed

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पती पत्नी और वो या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांचाही सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता ती दुर्गावती या सिनेमात दिसणार आहे. सिनेमाच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे. भूमी तख्त या सिनेमातही दिसणार आहे. अलीकडेच सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. याशिवाय ती भूत सिनेमातही दिसणार आहे.