‘दीपिका’, ‘प्रियंका’, ‘शिल्पा’ की ‘ऐश्वर्या’ ? कुणी घातली होती सर्वात महाग अंगठी ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज आपण बॉलिवूड मधील टॉप ॲक्ट्रेसच्या एंगटमेंट रिंग बद्दल माहिती घेणार आहोत. कोणत्या ॲक्ट्रेसनं साखरपुड्यात महागडी अंगठी घातली होती याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. आज याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

1) करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 2012 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या वेळी सैफनं करीनाला 5 कॅरेट प्लॅटिनम बँड वाली डायमंड रिंग दिली होती. याची किंमत अद्याप समोर आलेली नाही.

2) ऐश्वर्या रायनं 2007 साली अभिषेक बच्चन सोबत लग्न केलं. अभिषेकनं ऐश्वर्याला 50 लाखांची रिंग घातली होती, जी 54 कॅरेटची सॉलिटियर रिंग होती.

3) प्रियंका चोपडानं 2018 मध्ये अमेरिकन सिंगर निक जोनास सोबत लग्न केलं. त्याआधी साखरपुड्यात निकनं तिला 200000 डॉलर म्हणजेच जवळपास 1.40 कोटींची रिंग घातली होती.

4) अनुष्का शर्मा आण विराट कोहली यांनी 2017 मध्ये लग्न केलं. अनुष्कानं साखरपुड्यात 1 कोटीची रिंग घातली होती.

5) सोनम कपूरनं बिजनेसमन आनंद आहुजा सोबत लग्न केलं. आनंदनं साखरपुड्यात सोनमला 90 लाखांची रिंग घातली होती.

6) साऊथ इंडियातील सर्वात महाग ॲक्ट्रेस असिन थोट्टूमकल हिनं 2016 साली बिजनेसमन राहुल शर्मा सोबत लग्न केलं. असिननं तिच्या साखरपुड्यात 6 कोटींची 20 कॅरेटची सॉलिटियर रिंग घातली होती. असिनच ती ॲक्ट्रेस आहे जिची रिंग सर्वात महाग होती असं बोललं जात आहे.

7) शिल्पा शेट्टीनं साखरपुड्यात खूप महाग अंगठी घातली होती. बिजनेसमन राज कुंद्रानं तिला 20 कॅरेट सॉलिटियरची रिंग घातली होती. याची किंमत जवळपास 3 कोटी असल्याचं सांगितलं जातंय.

8) दीपिका पादुकोणनं 2019 मध्ये रणवीर सिंग सोबत लग्न केलं. दीपिकानं साखरपुड्यात जवळपास 2.7 कोटीची सिंगल सॉलिटियर स्क्वेअर डायमंड रिंग घातली होती.