25 Years of Coolie No. 1 : करिश्मानं शेअर केली पोस्ट, स्वत:च्याच कपड्याची उडवली खिल्ली !

बॉलिवूड स्टार करिश्मा कपूर आणि गोविंदा यांच्या कुली नंबर 1 या सिनेमाला आज (मंगळवार दि 30 जून 2020) 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या जरी दोन्ही स्टार्स पडद्यापासून दूर असले तरी एक काळ असा होता जेव्हा या दोघांची जोडी जबरदस्त हिट होती. दोघांनी सोबत अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. यापैकीच एक आहे कुली नंबर 1. आजही सिनेमातील गाणी लोक ऐकतात आणि पाहतात.

सिनेमाला 25 वर्षे झाल्यानंतर आता करिश्मा कपूरनं जुन्या दिवसांची आठवण काढली आहे. करिश्मानं एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती गोविंदाच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं लिहलं की, ते मजेदार क्षण कायम माझ्यासोबत जिवंत राहतील. माझ्या हृदयाजवळ असणाऱ्या सिनेमांपैकी एक. आपल्या नंबर 1 सीरिजची सुरुवात. कुली नंबर 1 ला 25 वर्षे पूर्ण झाल्यानं सेलिब्रेट करत आहे. या सुंदर प्रवासासाठी थँक्यु गोविंदा, डेविड धवन, वासु भगनानी. या पिकमधील माझा आउटफिट” असं म्हणत तिनं लाजणारी इमोजीही वापरली आहे.

लवकरच आता कुली नंबर 1 सिनेमाचा रिमेक येणार आहे. यात सारा अली खान आणि वरुण धवन प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाची शुटींगही पूर्ण झाली आहे.

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिनं डिजिटल डेब्यू केला आहे. अल्ट बालाजीच्या मेंटलहुड या सीरिजमध्ये करिश्मानं काम केलं आहे. तिच्या कामाचंही खूप कौतुक होताना दिसलं. या वेब सीरिजमधून तिनं दीर्घकाळानंतर अॅक्टींगमध्ये कमबॅक केलं आहे.