Video : BF सोबत ‘एन्जॉय’ करतेय अभिनेता आमिर खानची मुलगी इरा, पहा तिचा ‘भन्‍नाट’ डान्स

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची मुलगी इरा खान सध्या बॉयफ्रेंड मिशाल कृपलानी याच्यामुळे चर्चेमध्ये आहे. काही दिवसांपुर्वी इरा खानने आपल्या रिलेशनशिपविषयी कन्फर्म केले. सध्या इरा आणि मिशाल यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये इरा बॉयफ्रेंडसोबत टाइम स्पेंड करताना दिसत आहे. दोघेही आपल्या फ्रेंडसोबत डान्स करताना दिसत आहेत. तो व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये इरा खान आणि बॉयफ्रेंड मिशाल कृपलानी एकमेकांसोबत खूप खुश दिसत आहेत. कॅमेराकडे पाहत इरा मिशालला मिठी मारत आहे. इराने हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/BzNpUXWgOcz/

इराने आपल्या रिलेशनविषयी तेव्हा कन्फर्म केले होते जेव्हा चाहत्याने तिला एक प्रश्न केला त्यावर इराने मिशालसोबत फोटोंद्वारे उत्तर दिले. फोटोमध्ये इराने मिशालला मिठी मारली होती. हा फोटो इराने मिशालला टॅग पण केला होता.

https://www.instagram.com/p/Bvazw9fHozx/

यानंतर प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे होते की, ज्या मुलाला तु डेट करत आहेस, तो कोण आहे ? मिशाल न्यूयार्क बेस्ट म्यूजिक कंपोजर, प्रोड्यूसर आणि आर्टिस्ट आहे. इराने याआधी देखील यांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले होते. ती नेहमी सोशल मिडियावर ॲक्टिव्ह असते आणि दोघांचे फोटो शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/BtIXWUCn0Fg/

२२ वर्षाची इरा सध्या शिक्षण घेत आहे. इरा आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. असे समजले आहे की, इरा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याबाबतीत आमिर खानने सांगितले होते की, तिला चित्रपटसृष्टीत यायला आवडेल. ती नेहमी वडील आमिर खानसोबत दिसून येते.

आरोग्यविषयक वृत्त –  

‘हात थरथरणे’ सामान्य समस्या नाही, कारण…

‘या’ पद्धतीने चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या

आहारातील तंतुमय पदार्थ करतात हृदयरोगां पासून बचाव

नियमित भात खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे