आमिरची खानची लाडकी इरा ‘या’ क्वारंटाईन बडीसोबत घालवतेय क्वालिटी टाईम !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार आमिर खानची लाडकी इरा नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत असते. लाईमलाईटपासून दूर असणारी इरा आपला वेळ आपले मित्र, कुटुंबीय किंवा अशा कामात घालवते जे केल्यानं तिला आनंद मिळेल. इरा जवळपास रोज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की आपल्या फोटोंमुळे चर्चेत येत असते. सध्या इरा लॉकडाऊनमध्ये वडिल आणि तिचा सावत्र बाऊ आझाद सोबत टाईम स्पेंड करत आहे. तिनं त्याला क्वारांटाईन बडी म्हटलं आहे.

इरानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती तिचा सावत्र भाऊ आझादसोबत दिसत आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. फोटो शेअर करताना इरा म्हणते, क्वारंटाईन बडी. फोटोत दित आहे की, फक्त इराचे ओठ फक्त लाल दिसत आहे. बाकी पूर्ण फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. इरानं छान पाऊट केलं आहे.

इरानं शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडिायावर व्हायरल होताना दिसत आहे. इराच्या अनेक चाहत्यांना हा फोटो आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

Quarantine buddy🧡

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

इराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं डायरेक्शनमध्ये पदार्पण केलं आहे. इरानं ‘युरीपाईड्स मेडिया’ (‘Euripides Medea’) हे नाटक डायरेक्ट केलं आहे. अशी माहिती होती की, या नाटकातून सिक्सर किंग युवराजची पत्नी हेजल किच ही अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार होती.