तुर्कीच्या ‘फर्स्ट लेडी’ला भेटला आमिर खान ! पांढरे केस अन् असा होता लुक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान सध्या जबरदस्त चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून शुटींग बंद असलेल्या त्याच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाचं कामही सुरू झाले आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आमिर खान कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत परदेशात पोहोचला आहे. चित्रपट लाल सिंह चड्ढाचे शूटिंग तुर्कीमध्ये होत आहे. यासंदर्भात आमिर खान देखील तुर्कीला पोहोचला आहे आणि यावेळी त्यांनी तुर्कीची पहिली महिला एमीन एर्दोगन यांची भेट घेतली आहे.

आमिर आणि तुर्कीची फर्स्ट लेडी एमिन एर्दोगन यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटोज स्वतः तुर्कीची फर्स्ट लेडी एमीन एर्दोगन यांनी शेअर केले आहेत. फोटोज शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, “आमिर खानला भेटून मला खूप आनंद झाला. ज्यांना जगभरात प्रशंसा मिळाली असे भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक इस्तानबुल मध्ये आहेत. तुर्कीमध्ये बर्‍याच ठिकाणी आपल्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाचे शूटिंग आमिर खानने पूर्ण केले आहे हे समजल्यानंतर मला आनंद झाला आहे. मी आता सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे.”

समोर आलेल्या फोटोंमध्येदेखील आमिर खानसुद्धा तुर्कीची फर्स्ट लेडी एमीन एर्डोगन यांना भेटून खूप आनंदीत झाल्याचं दिसत आहे. इतकेच नाही तर एमीन एर्दोगनने शेअर केलेल्या फोटोमध्ये आमिर खानचा तो लूक दिसून येत आहे, जो लाल सिंह चड्ढा चित्रपटामध्ये दिसणार आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये आमिर खान पांढर्‍या केसांच्या लुकमध्ये दिसत आहे. आमिर खान खूपच स्ट्राँग दिसत आहे. असं समजत आहे की, त्याने सिनेमासाठीच बॉडी बनवली आहे.

लाल सिंह चड्ढा सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर आमिर खानच्या या चित्रपटाच्या काही भागांची शूटिंग भारतातच पंजाबमधील अनेक ठिकाणी झाली आहे. या चित्रपटात करीना कपूर आमिर खान सोबत दिसणार आहे. हा चित्रपट यापूर्वी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता पण आता याची रिलीज डेट 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.