मुलगी इराच्या Live वर्कआऊट सेशनमध्ये अचानक आला आमिर खान, ट्रेनरसोबत मारल्या मजेदार गप्पा ! (व्हिडीओ)

बॉलिवूड स्टार आमिर खानची लाडकी इरा खान नेहमीच आपल्या फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत असते. लाईमलाईटपासून दूर असणारी इरा आपला वेळ आपले मित्र, कुटुंबीय किंवा अशा कामात घालवते जे केल्यानं तिला आनंद मिळेल. इरा जवळपास रोज म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की आपल्या फोटोंमुळे चर्चेत येत असते. सध्या इरा लॉकडाऊनमध्ये वडिल आणि तिचा सावत्र भाऊ आझाद सोबत टाईम स्पेंड करत आहे. इरा या काळात वर्कआउटवरही लक्ष देत आहे. नुकतीच ती एका व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे.

सध्या इरा प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर डेविड पॉजनिकसोबत वर्कआऊट करत आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात इंस्टा लाईव्हच्या माध्यमातून हे वर्कआऊट सुरू आहे. इरा इंटेस वर्कआऊट करत असताना अचानक तिचे वडिल आमिर खान मध्ये आला.

आमिरनं वर्कआऊटमध्ये येऊन डेविड पॉजनिकसोबत गप्पाही मारल्या. आमिर फक्त हाय बोलण्यासाठी आला होता. डेविड त्याला काही पुशअप्स मारण्यासाठी सांगतो. परंतु आमिर त्याला मनाई करतो. परंतु त्यानं शब्द दिलाय की, पुढील सेशनमध्ये तो नक्कीच वर्कआऊट करेल.

डेविडनं हा व्हिडीओ इंस्टावरून शेअर केला आहे. डेविड म्हणतो, “धूम 3 आणि पीके साठी आमिरला ट्रेन करत होतो तेव्हा इरा आमच्यासोबत खूप फिरत असे. परंतु जेव्हा मी वर्कआऊट करायला सांगायचो तेव्हा ती पळ काढायची. आता आम्ही साप्ताहिक वर्कआऊट करत असतो.”

इराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं डायरेक्शनमध्ये पदार्पण केलं आहे. इरानं ‘युरीपाईड्स मेडिया’ (‘Euripides Medea’) हे नाटक डायरेक्ट केलं आहे. अशी माहिती होती की, या नाटकातून सिक्सर किंग युवराजची पत्नी हेजल किच ही अभिनय क्षेत्रात कमबॅक करणार होती.