‘भाईजान’ सलमानचा ‘जीजू’ आयुष शर्मा बनणार ‘जाट गँगस्टर’, मस्क्युलर बॉडीसाठी लागली ‘एवढी’ वर्षे

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता आयुष शर्मा सध्या आपला आगामी सिनेमा क्वाथा च्या तयारीत बिजी आहे. लवयात्री या सिनेमातून त्यानं आपला डेब्यू केल होता. हा सिनेमा खास काही चालला नाही. आता क्वाथा या सिनेमातून तो दीर्घकाळानंतर वापसी करत आहे. या सिनेमात आयुष एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी सिनेमात त्याचा हटके लुक दिसणार आहे.

क्वाथा या सिनेमानंतर सुगबुगाहट या सिनेमात आयुष दिसणार आहे. या सिनेमात आयुष एका जाट गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी आयुषनं आपल्या फिजीकवर खूप मेहनत घेतली आहे. सध्या त्याच्या या लुकची खूप चर्चा होत आहे. आयुषनं अनेकदा आपल्या बदलत्या लुकचे फोटो अनेकदा सोशलवर शेअर केले आहेत.

मस्क्युलर आणि टोन्ड बॉडीचा फोटो शेअर करताना आयुष म्हणतो, “हा एक मोठा प्रवास होता. 12 किलो लीन मसल्स बनवायला मला 1 वर्ष लागलं. माझं ध्येय गाठण्यासाठी 100 टक्के डेडीकेशन दाखवण्यासाठी राजेंद्र ढोले यांचे आभार.”

क्वाथा सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमातून कॅटरीना कैफची बहिण ईसाबेल कैफ डेब्यू करणार आहे. करण भुटानी सिनेमा डायरेक्ट करत आहे. अद्याप सिनेमाची रिलीज डेट समोर आलेली नाही.