अभिषेक बच्चननं नेपोटिज्मवर तोडलं मौन, म्हणाला- ‘वडिलांनी माझ्यासाठी नाही तर मी त्यांच्यासाठी चित्रपट प्रोड्यूस केला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिज्मचा मुद्दा बऱ्याच काळापासून सुरू आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर लोकांनी स्टार किड्सना लक्ष्य केले. अलीकडेच या विषयावर बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याने आपले मौन तोडले. 2000 मध्ये ‘रिफ्यूजी’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिषेक म्हणाला की, त्याच्या वडिलांनी कधीही त्याच्यासाठी (अभिषेक) कोणालाही फोन केला नाही किंवा कोणत्याही चित्रपटासाठी फायनेंस दिले नाही.

अभिषेक बच्चन म्हणाला की, नेपोटिज्मविषयी बोलले जात आहे, परंतु हे खरे आहे की, आजपर्यंत वडिल माझ्यासाठी कुणाशीही कधी बोलले नाहीत. एका मुलाखती दरम्यान तो म्हणाला की, वडिलांनी माझ्यासाठी चित्रपट बनविला नाही, परंतु मी त्यांच्यासाठी एक चित्रपट प्रोड्यूस केला, ज्याचे नाव आहे ‘पा’.

तो म्हणाला की, हा व्यवसाय आहे हे लोकांना समजून घ्यावे लागेल. पहिल्या चित्रपटानंतर, जर त्यांना तुमच्यात काही दिसत नसेल किंवा चित्रपट चांगले कामगिरी करत नसेल तर तुम्हाला काम मिळणार नाही. तो म्हणाला की, आपली प्रतिभा दाखविण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागते आणि हेच जीवनाचे कडू वास्तव आहे.

अभिषेकने आपल्या ड्रिम रोलबद्दल सांगितले की, अभिनेता होण्यापूर्वी एकदा शाहरुखने त्याला सांगितले होते की, फेव्हरेट रोल तोच असला पाहिजे जो वर्तमानात तुम्ही करत आहात. जर तसे नसेल तर मग तुम्ही ती निवड का केली.

अभिषेक बच्चनला सोशल मीडियावर बर्‍याचदा ट्रोल केले जाते. अलीकडेच जेव्हा तो आणि अमिताभ बच्चन दोघेही कोरोनामुळे ग्रस्त झाले होते तेव्हा सोशल मीडियावर ट्रोलर्सने त्याला ट्रोल केले होते, त्यावर त्याने ट्रोलर्सला चांगलेच उत्तर देऊन त्यांचे तोंड बंद केले होते.

त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणले तर तो अनुराग कश्यपच्या ‘लुडो’ चित्रपटात दिसणार आहेत. यात तो गुन्हेगाराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात राजकुमार राव, रोहित सराफ, पंकज त्रिपाठी, सान्या मल्होत्रा हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.