Abhishek Bachchan 29 दिवसानंतर Covid-19 निगेटिव्ह, जाणून घ्या बच्चन कुटुंबातील कोणी किती दिवस केली ‘कोरोना’शी लढाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय काही दिवसांपासून कोरोना विषाणूची लढाई लढत आहे. गेल्या महिन्यात बच्चन कुटुंबातील चार सदस्य अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले गेले आणि आता ते सर्व या आजारातून बरे झाले आहेत. सर्वात शेवटी अभिषेक बच्चनची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, जो शनिवारी पूर्णपणे यातून मुक्त झाला आहे. जाणून घेऊया बच्चन कुटुंबातील कोणत्या सदस्याने किती दिवस कोरोनाची लढाई लढली…

अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चनचा कोरोना अहवाल ११ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. अभिषेक सोबत अमिताभही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर ११ जुलै रोजी रात्री दोघांनाही मुंबईच्या नानावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर ८ ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले, ते सुमारे २९ दिवस रुग्णालयात होते.

अमिताभ बच्चन
अमिताभ यांनाही ११ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण २ ऑगस्टला चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. म्हणजेच त्यांना रुग्णालयात २३ दिवस राहावे लागले.

ऐश्वर्या राय बच्चन
अभिषेक बच्चनने १२ जुलैला ऐश्वर्या राय बच्चनच्या पॉझिटिव्ह असण्याबद्दल माहिती दिली होती. मात्र कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला रुग्णालयात भरती केले गेले नव्हते, तर घरी क्वारंटाइन केले गेले होते. मात्र जवळपास ५ दिवसानंतर तिलाही १७ जुलैला रुग्णालयात दाखल केले गेले आणि २७ जुलैला चाचणी निगेटिव्ह आल्यावर तिला डिस्चार्ज दिला गेला.

आराध्या बच्चन
आराध्याही १२ जुलै रोजी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळली होती आणि त्यानंतर तिला १७ जुलैला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि २७ जुलै रोजी डिस्चार्ज दिला गेला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like