अभिषेक बच्चननं ‘कोरोना’ व्हायरसवर केली मात, ट्विट करून दिली ‘ही’ खुशखबर

पोलिसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या फॅमिलीनंतर आता अभिनेता अभिषेक बच्चन यानं कोरोनावर मात केली आहे. बच्चन कुटुंबातील बिग बी, ऐश्वर्या आणि आराध्या यांना कोरोनाची लागन झाली होती. परंतु हे सर्व सदस्य बरे होऊन घरी पोहोचले होते. यानंतर आता अभिषेकनंही कोरोनाविरोधातली लढाई जिंकली आहे. त्याचे कोरोना टेस्ट रिपोर्टही आता निगेटीव्ह आले आहेत. खुद्द अभिषेक बच्चन यानच सोशल मीडयावरून ही खुशखबरी दिली आहे.

अभिषेकनं ट्विट करत लिहिलं आहे की, “एक वचन हे वचन असतं. दुपारी माझी कोविड-19 टेस्ट निगेटीव्ह आली आहे. मी तुम्हा सर्वांना सांगितलं होतं की, मी यावर मात करेन. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी पार्थना केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. नावावती हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि नर्सेस यांचे खूप खूप आभार.”

अभिषेकच्या या ट्विटवरूनच त्याचा आनंद दिसत आहे. त्यानं ट्विट करताच हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं. अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. असंही सांगितलं जात आहे की, आता लवकरच अभिषेकला डिस्चार्ज मिळेल. डिस्चार्जबद्दल अभिषेकनं कोणतीही माहिती दिलेली नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like