‘हा’ खिलाडी अक्षय कुमारचा ‘डुप्लिकेट’ ! (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. बॉलिवूडमधील मोठ्या अभिनेत्यासारखा दिसत असल्याने या व्यक्तीची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या या व्यक्तीचा फोटो सोशलवर शेअर केला जात आहे. या फोटोमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे तो व्यक्ती काश्मीरमधील आहे. ते सुनील गावस्कर या क्रिकेटपटूचे चाहते आहेत. ते दररोज क्रिकेटमध्ये अंपायर घालतो तशी गोल टोपी घालतात. या व्यक्तीचं नाव आहे माजिद मीर. एका पत्रकाराने या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

माजिद मीर यांचा फोटो समोर येताच व्हायरल व्हायला सुरुवात झाली. काही नेटकरी म्हणाले, अरे हा तर खिलाडी अक्षय कुमार. यानंतर लगेचच काही नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिली. काही युजर्सने म्हटलं आहे की, अक्षय कुमारच्या बायोपिकमध्ये यांनाच भूमिका दिलेली उत्तम असेल. काही युजर्स म्हणाले की, हे तर खिलाडी अक्षय कुमारचं वयोवृद्ध व्हर्जन आहे. काही म्हणाले की, अक्षय कुमार उतारवयात असाच दिसेल.

एखाद्या सेलेब्रिटीसारखा दिसणारा चेहरा समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी अनुष्का शर्मा, प्रियंका चोपडा आणि इतरही कलाकरांच्या चेहऱ्याशी मिळतेजुळते चेहरे असणाऱ्या व्यक्ती प्रकाशझोतात आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –