ड्रग्स खरेदी केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेते दिलिप ताहिल यांच्या मुलाला अटक, ANC ची कारवाई

पोलीसनामा ऑनलाइन – ड्रग्सची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलिप ताहिल यांचा मुलगा ध्रुव ताहिल याला मुंबई पोलिसांनी बुधवारी (दि. 5) अटक केली आहे. अँन्टी नार्कोटिक्स सेलचे आयुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई केल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एनसीबीने बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटवर डोळा ठेवून आहे. यात अनेक सेलिब्रिटींची चौकशीदेखील केली आहे. ड्रग्स संदर्भातील एका प्रकरणात चौकशी दरम्यान ध्रवचे नाव समोर आले होते. ध्रुववर ड्रग्सची खरेदी विक्री केल्याचे आरोप आहेत. चौकशी दरम्यान यापूर्वी अटक आरोपी मुजम्म‍िल अब्दुल रहमान शेख याच्याकडून 35 ग्रॅम मेफड्रोन जप्त केले आहे.

तसेच त्याचामोबाईल जप्त केला आहे. यात ध्रुवने आरोपीशी ड्रग्स संबंधित चॅट केल्याचे समोर आले आहे. ध्रुव हा 2019 पासून मार्च 2021 पर्यंत आरोपी शेखच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ध्रुवच्या व्हाटस्अॅप चॅटवरून त्याने आरोपीशी ड्रग्स घेण्यासाठी संपर्क केल्याचे समोर आले आहे. तसेच ध्रुवने आरोपी शेखच्या खात्यात 6 वेळा पैसै ट्रान्सफर केल्याचाही आरोप आहे. अँटी नार्कोटिक्स सेलचे आयुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात एएनसीची टीम तपास करत आहे.