Video : अरे देवा ! Visa भारतात विसरून विवेक ओबेरॉय पोहोचला दुबईला, अन्…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत त्यानं सांगितलं आहे की, नुकताच तो एका कामासाठी दुबईला गेला होता. परंतु तिथं गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की, त्याच्याकडे व्हिसा नाहीये. यावेळी त्याला अनेक समस्या आल्या. परंतु यावेळी काही अधिकाऱ्यांनी त्याला मदतही केली. ही घटना त्यानं व्हिडीओतून सांगितली आहे.

विवेकनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो म्हणतो की, मी माझ्या एका कामासाठी दुबईला गेलो होतो. तिथे माझ्यासोबत घडलेली घटना मी तुमच्यासोबत शेअर करावी असं मला वाटतं. मी दुबईला पोहोचल्यावर माझ्या लक्षात आलं की, मी माझा व्हिसा भारतात विसरलो आहे. तसंच माझ्या मोबाईलमध्ये व्हिसाची डिजिटल कॉपीही नाहीये. मी मोठा गोंधळ घातलाय हे मला कळालं होतं. काय करावं मला काहीच सुचत नव्हतं. खरं तर तुम्ही दुबईला पोहोचल्यावर सुद्धा व्हिसा काढू शकता. परंतु मी भारतात असताना व्हिसा घेतला असल्यानं दुबईतून माझा व्हिसा होऊ शकणार नाही याची मला खात्री होती. या सगळ्यात मी काय करू मला कळत नव्हतं.


पुढं बोलताना विवेक म्हणाला, दुबईतील काही मंडळींनी मला या संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत केली होती. तेथील इमिग्रेशन कंट्रोल, तसंच पासपोर्ट अधिकाऱ्यांना मी माझा प्रॉब्लेम सांगितला आणि त्यांनी मला खूप मदत केली. तिथे एक महिला अधिकारी होत्या त्या मला एअरपोर्टवरील विविध विभागात घेऊन गेल्या आणि तिथं आवश्यक असणाऱ्या सगळ्या तरतुदी त्यांनी पूर्ण केल्या. मला मदत केल्या बद्दल मी दुबई एअरपोर्टवरील अधिकाऱ्यांचे आभार मानतो. त्यामुळंच माझा प्रवास सुखकर झाला.