इम्रान खानची पत्नी अवंतिकाचा तुटलेल्या नात्याकडे इशारा ! म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार आमीर खान (Aamir Khan) चा भाचा आणि अभिनेता इम्रान खान (Imran Khan) सध्या आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमांतून गायब असणारा इम्रान अचानक चर्चेत आला होता, जेव्हा त्याची पत्नी अवंतिका मलिक खान (Avantika Malik Khan) त्याच्यापासून वेगळी राहू लागली होती. अवंतिका आणि इम्रान खान नात्यात कटुता असल्याच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांत समोर आल्या आहेत. अलीकडेच अवंतिकानं एक पोस्ट शेअर केली आहे. लोक आता ही पोस्ट तिच्या पर्सनल लाईफशी जोडून पाहात आहेत. आपल्या पर्सनल लाईफबद्दल अद्याप इम्रान आणि अवंतिका यांनी कुणीही खुलून भाष्य केलेलं नाही. आता त्यांच्या नात्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांमध्ये अवंतिकाची ही पोस्ट मात्र चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

अवंतिकानं तिच्या इंस्टा स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं की, मी ठीक होत आहे. ड्रिकिंग, स्मोकिंग यात बुडण्याऐवजी, खाणं, झोपणं आणि परेशान होण्याऐवजी आणि परिस्थितीपासून पळण्याऐवजी त्याचा सामना करा. हिलिंग फीलिंगनंच शक्य आहे.

अवंतिकाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टनंतर आता चाहते अवंतिका आणि इम्रान खान यांच्या नात्याबद्दल अनेक तर्क लावताना दिसत आहेत. अनेकांनी या स्टोरीला कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिली आहे.

You might also like