COVID-19 : अभिनेते किरण कुमार यांची तिसरी ‘कोरोना’ टेस्ट ‘निगेटीव्ह’, ‘या’ घरगुती गोष्टींनी झाला ‘लाभ’ !

पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेते किरण कुमार यांची 14 मे 2020 रोजी केलेली कोरोना व्हायरस टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. आता त्यांची तिसरी टेस्ट मात्र निगेटीव्ह आली आहे. बंगल्यातील एक खोलीतच त्यांन स्वत:ला क्वारंटाईन केलं होतं. आता त्यांना निरोगी वाटत आहे.

एका स्टेटमेंटमध्ये किरण कुमार म्हणाले, “मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. काही दिवसांपूर्वी मला वैद्यकीय चाचणी करावी लागली. यात कोविड 19 टेस्ट अनिवार्य होती. मी माझ्या मुलीसोबत होतो. आम्ही हसी मजाक करत होतो. आम्हाला वाटलं की ही फक्त एक औपचारिकता आणि मग आपलं रेग्युलर रुटीन सुरू राहिल. आम्ही खूप उत्साहित होतो. माझी टेस्ट पॉझिटीव्ह आली. एका तासातच मी मला एका खोलीत बंद केलं आणि सेल्फ आयसोलेशनमध्ये गेलो. मी याबद्दल बीएमसीला माहिती दिली आणि सर्व प्रकारच्या व्हिटॅमिनचं सेवन केलं.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आज कोरोनाची टेस्ट केली तर त्याचा रिजल्ट निगेटीव आला आहे. मला हे सांगताना आनंद वाटत आहे. माझ कुटुंब अजूनही घरात सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. मी दिवसभर ध्यान आणि योगा करायचो. ओटीटी कंटेट पाहायचो. दीर्घकाळापासून खरेदी केलेली पुस्तकं होती तीही मी वाचली. या काळात मी जर काही शिकलो असेल तर ते हे आहे घाबरायचं नाही.”

किरण कुमार सांगतात, “ही एवढी विचित्र वेळ आहे की, मोसमी खोकला किंवा कफ देखील भयावह वाटतो. मी सर्व कर्मचाऱ्यांना, मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबांना धन्यवाद देतो. मग तो फेसटाईम कॉल असो किंवा मग घरगुती उपचार असो. खासगी मेडिको सुपरमॅनप्रमाणं माझ्यासोबत उभं राहण्यासाठी डॉ दीपक उग्रा यांना विशेष धन्यवाद. डॉक्टर्स, नर्स खरे सुपरहिरो आहेत त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. लव किरण.”