सिनेमाच्या शुटिंगदरम्यान एकाच वेळी 2 अभिनेते झाले ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, अर्जुन रामपालनं फोटो शेअर करून सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   देशात कोरोना व्हायरसचा कहर थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. रोज कोरोनाची जास्तीत जास्त प्रकरणे समोर येत आहेत. बॉलीवुड इंडस्ट्रीमधून सुद्धा अनेक सेलिब्रिटीज या व्हायरसने बाधित झाले आहेत. तर आता पुन्हा असाच प्रकार समोर आला आहे. एका फिल्मच्या शूटिंगदरम्यान दोन-दोन अ‍ॅक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे दोन्ही अ‍ॅक्टर्स आहेत मानव कौल आणि आनंद तिवारी. याबाबत अभिनेता अर्जुन रामपालने माहिती दिली आहे. त्याने हे सुद्धा सांगितले की, त्यांची स्थिती कशी आहे आणि ते कशी काळजी घेत आहेत.

अर्जुन रामपालने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक सेल्फी शेयर केला आहे. या फोटोत अर्जुन रामपाल आपल्या घरात बसलेला दिसत आहे. याच पोस्टमध्ये त्याने मानव कौल आणि आनंद तिवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. त्याने म्हटले आहे की, त्याची आगामी फिल्म ‘नेल पॉलिश’ ची शूटिंग तात्काळ रोखण्यात आली आहे.

अर्जुन रामपालने लिहिले आहे, मी घरीच क्वारंटाइन आहे. मागील दिवसात नेल पॉलिशच्या सेटवर मानव कौल आणि आनंद तिवारी कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रॉडक्शनने त्वरीत शूट रोखले आणि सर्वांना आराम करण्यास सांगितले आहे. मी माझ्या घरीच क्वारंटाइन आणि रिझल्ट येण्याची वाट पहात आहे. सर्वांपासून दूर रहात आहे. लवकर बरे व्हा मुलांनो.

मुंबईत संक्रमित रूग्णांची संख्या बुधवारी 1,90,138 झाली आहे. शहरात आणखी 52 लोकांचा मृत्यू झाल्याने एकुण मृतांची संख्या वाढून 8,601 झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like