‘हेलन’च्या रिमेकमध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार जान्हवी कपूरच्या वडिलांची भूमिका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमीच आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळं चर्चेचा हिस्सा बनत असते. अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो किंवा वर्कआउटचे फोटो आणि काही व्हिडिओ सोशलवर व्हायरल होत असतात. पुन्हा एकदा जान्हवी चर्चेत आली आहे. जान्हवी लवकरच तिचा आगामी सिनेमा हेलनच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. हेलन (Helen) हा मल्याळम सिनेमा आहे.

आता अशी माहिती समोर आली आहे की, दिग्गज अभिनेते मनोज पाहवा (Manoj Pahwa) हे हेलन सिनेमात जान्हवीच्या वडिलांची भमिका साकारणार आहेत. या सिनेमाची स्क्रीप्ट ऐकल्यांतर ते खूप उत्साहित झाले होते. सिनेमासाठी होकार देण्यासाठी त्यांनी जराही उशीर केला नाही. बोनी कपूर आणि मनोज पाहवा यांच्यात चांगले संबंध आहेत. बोनी कपूरच्या वॉन्टेड सिनेमातही त्यांनी रोल साकारला होता. यात त्यांनी सोनू गेट्स ही भूमिका साकारली होती.

हेलन सिनेमाची शूटिंग आगामी 2-3 महिन्यात सुरू होणार आहे. सिनेमाशी संबंधित तयारीही सुरू झाली आहे. झी स्टुडिओ आणि बोनी कपूर सिनेमाची निर्मिती करणार आहेत. मथुकुट्टी जेवियर सिनेमाचं डायरेक्शन करणार आहेत. ओरिजनल सिनेमाही त्यांनी डायरेक्ट केला आहे. हेलनच्या स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर ही एक एका तरुण नर्सची स्टोरी आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरिजमध्येही ती दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती रुही अफजाना या सिनेमात राजकुमार रावसोबत काम करताना दिसणार आहे. अलीकडेच जान्हवीनं गुंजन सक्सेनाचा बायोपिक असलेला गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही काम केलं आहे. तिच्यासोबत पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. याशिवाय तिच्याकडे करण जोहरचा मल्टीस्टारर तख्त हा सिनेमादेखील आहे.

You might also like