माजी खासदार आणि अभिनेता परेश रावल यांच्या ड्रायव्हरला बलात्कारप्रकरणी अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे माजी खासदार आणि बॉलिवूडमधील अभिनेते परेश रावल यांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली असून बलात्काराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. अशोक असे त्याचे नाव असून मागील दहा वर्षांपासून तो परेश रावल यांच्याकडे नोकरी करत आहे. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून विविध कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक हा परेश रावल आणि त्यांच्या पत्नीच्या गाडीवर ड्रायव्हर असून त्याला या प्रकरणात 16 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला त्यांच्या घरच्या दुसऱ्या ड्रायव्हरच्या मदतीने अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या ड्रायव्हर कलम 376, 50, 67 आणि 67 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, परेश रावल हे भाजपचे माजी खासदार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे चाहते आहेत. 2014 मध्ये त्यांनी अहमदाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी त्यांनी निवडणूक लढवली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like