मोदींबद्दलच्या ‘त्या’ ट्विटवरून काँग्रेसवर संतापला आर. माधवन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सगळेच राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. त्यात भाजपा आणि काँग्रेस पक्षात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बाॅलिवूड अभिनेता आर. माधवन याने पंतप्रधान मोदींना पाठिंबा देत काँग्रेसने शेअर केलेल्या त्या व्हिडीओचा निषेध केला आहे.

काँग्रेसच्या ट्विटर हँडलरवरून 14 मार्चला पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यातल संवादाचा एक शेअर केला आहे. हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. शिवाय त्यात मोदींची खिल्ली उडवण्यात आली आहे. यात #HugplomacyYaadRakhna हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसचं हे ट्विट चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आर माधवन संतापला आहे. त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान या ट्विटबाबत आपली प्रतिक्रिया देताना आर माधवन यानेही ट्विट केले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “सध्या देशात निवडणुकीची धामधूम सुरु असल्यामुळे प्रत्येक पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारच. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचं पंतप्रधान आहेत. त्यांच्यावर अशी टीका करणं योग्य नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांच्यावर टीका करताय पण ही टीका करत असताना चीनसमोर आपल्याच राष्ट्राची बदनामीही करताय. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाकडून ही गोष्ट होणं खरंच अपेक्षित नव्हतं” असं म्हणत आर माधवन याने नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुक 2019 च्या तारखा जाहीर झाल्या असून आचारसंहिताही लागू झाली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने देशातील 543 लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एकूण 7 टप्प्यात निवडणुका होणार आहे.